Powered By Blogger

Monday, November 4, 2013

शिंडलर्स लिस्ट – ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग यांचा 1993 मध्ये रिलिज झालेला हॉलिवूडचा चित्रपट !
काल हा चित्रपट पाहण्याचा योग आला.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीमध्ये नाझींकडून झालेल्या ज्यूंच्या वंशविच्छादावार (जिनोसाईड) आधारीत हा चित्रपट सून्न करुन गेला. परिणामकारकता वाढविण्यासाठी स्पिलबर्ग यांनी चित्रपट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये छायाचित्रीत केला आहे. नाझी पक्षाचा लेफ्टनंट असलेला अमोन गोथ एकिकडे अत्यंत निर्दयीपणे एकेका ज्यूला वेचून वेचून ठार मारत असतो. विषारी गॅसचेंबरमध्ये कोंबून अनेक ज्यूंचा वंशविच्छाद त्याने आरंभलेला असतो ; तर नाझी पक्षाचाच सदस्य असलेला जर्मन उद्योगपती ऑस्कर शिंडलर हा एकेका ज्यूला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत असतो. या द्वद्वांवर आधारीत हा चित्रपट निर्दयता, क्रूरता आणि मानवता यांचा भयंकर संघर्ष दाखवतो.
एखादा चित्रपट किती प्रभावीपणे बनविला जाऊ शकतो याचे आदर्श उदाहरण म्हणून शिंडलर्स लिस्ट पहायलाच हवा. दिग्दर्शन, अभिनय, पार्श्वसंगीत, संकलन, छायाचित्रण अशा सर्वच आघाड्यांवर चित्रपटाने समिक्षकांकडून पैकीच्या पैकी गुण मिळवलेले आहेत.       


            

No comments:

Post a Comment